Sunday 1 July 2018

कागदी पाकिटांची निर्मिती करतांना किरण चंद्राकार

   सेवावृत्तीला मिळाला बूस्ट

रद्दी संकलनातून मिळाली              "ग्लोबल बाजारपेठ"

गेल्या काही वर्षांत शहरात समाजसेवेच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. ती होती रद्‌दी संकलन. सुरुवातीला नागरिकांना रद्‌दी दान करण्याचे आवाहन करण्यात आले आणि त्यातून उभ्या राहीलेल्या पैशांचा समाजोपयोगी कार्यासाठी खर्च होत गेला. आता प्लास्टिक बंदीच्या निर्णयामुळे अशाच एका उपक्रमाचा वटवृक्ष होऊ पाहतोय. कारण सेवाकार्य करण्यासाठी सुरू झालेले "परिवर्तन जागृती मिशन ग्लोबल बाजारपेठेच्या उंबरठ्यावर आहे.
शुभाषनगर भागात कामगार कॉलनीत राहणारे नरेश शेंडे 2013 मध्ये एका एनजीओच्या संपर्कात आहे. काही काळ काम केले आणि मित्रांना सोबत घेऊन परिवर्तन जागृती मिशनची सुरुवात केली. या उपक्रमाच्या माध्यमातून रद्दी संकलन करून त्याचे पाकिटे तयार केले जातात. हे काम गरीब वस्तीत राहणाऱ्या महिलांना मिळाल्याने त्यांना घरबसल्या रोजगार उपलब्ध झाला. विशेष म्हणजे या उत्पन्न साठी कोणतेही यंत्र लागत नसल्याने महिलांनी त्यांना सहकार्य केले. त्यामुळे किमान 3 हजार रुपयांचे उत्पन्न या महिला घेऊ लागल्या आहेत. आत्तापर्यंत पाकिटांची विक्री केवळ फार्मस्यांमध्येच होत होती. मात्र आता किराणा, कपडा दुकानातूनही कागदी पिशव्यांची मागणी वाढते आहे. त्यामुळे या पाकिटांना प्लास्टिक बंदीच्या निर्णयामुळे बूस्ट मिळालाच मात्र सेवाभावी वृत्तीतून सुरू झालेल्या कार्याचा वटवृक्ष होतो आहे.

जागतिक बाजारपेठ मिळावी असे प्रयत्न


गरीब वस्तीतील महिलांना संघटीत करून दोन वर्षांपूर्वी बचतगट सुरू केला. मात्र या बचतगटाला जागतिक बाजारपेठ मिळावी असे प्रयत्न सुरू आहे. आम्ही लवकरच यशस्वी होऊ.
नरेश शेंडे, संयोजक, परिवर्तन जागृती मिशन.

छोटे-मोठे सगळेच मदत करतात

आम्ही दिवसाला हजार पाकीटांचे लक्ष ठेवतो. महत्त्वाचे म्हणजे यासाठी घरातले छोटे-मोठे सगळेच मदत करतात. त्यामुळे हे आमच्या आर्थिक उत्पन्नाचे साधन बनले आहे.ंद्राकार, सदस्या.

रोजगाराचे साधन झाले

यंत्रसाधनांची, जागेची गरज नसल्याचे आम्हला सुलभ जाते. आम्ही उपक्रम म्हणून या साऱ्यांकडे बघितले. मात्र आता हे रोजगाराचे साधन झाले आहे.
जयमाला सरोदे, सदस्या.
शिवाय उपक्रम सुरू
पाहुण्यांचे येणे जाणे, घरातील सर्व कामे सांभाळून हे काम करत असल्याने त्याचे कधीच टेंशन जाणवले नाही.
अर्चना खंडाते, सदस्या.